Rohit Pawar । मॅक्सवेलचं द्विशतक अन् शरद पवारांचा ‘तो’ फोटो, रोहित पवार यांनी केले ट्विट

Rohit Pawar

Rohit Pawar । सध्या वर्ल्डकपचे सामने सुरु आहेत. काल अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Afghanistan vs Australia) असा सामना रंगला होता. या सामन्यात अफगाणिस्तानचा दारुण पराभव झाला. ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याच्या दमदार खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला हा सामना आपल्या खिशात घालता आला. हा सामना आता वेगळ्याच कारणावरून चर्चेत आला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. (Latest Marathi News)

Viral Video । चालत्या ट्रेनमधून तरुणीने बाहेर काढले तोंड; समोरच्या ट्रॅकवरून आली दुसरी ट्रेन अन् घडलं भयानक; व्हिडीओ पाहून धक्का बसेल

रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा साताऱ्यातील पावसातील सभेचा फोटो आणि ग्लेन मॅक्सवेलचा फोटो ट्विट केला आहे. रोहित पवार यांनी मॅक्सवेलच्या द्विशतकचा संबंध शरद पवारांशी जोडला आहे. वापरकर्ते या ट्विटवर असंख्य प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ट्विटवरून क्रिकेट आणि राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.

‘परिस्थिती आपल्या कितीही विरोधात असली आणि मैदानात ‘योद्धा’ जखमी झाला तरी वेदनांना गाडून त्यावर हास्याचा लेप लावत त्वेषानं लढावं लागते. नुसतं लढावंच लागत असं नाही तर शानदार पद्धतीने विजयही खेचून आणावा लागतो. या वेळी परिस्थिती देखील नक्कीच साथ देत असते. मग ते मैदान क्रिकेटचं असो की राजकीय! हेच काल ग्लेन मॅक्सवेलनं दाखवून दिल आहे,’ अशा आशयाचे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.

Big Boss । बिग बॉसच्या घरात ऐश्वर्या आणि नील एकमेकांशी भिडले

Spread the love