Maratha Reservation । मराठा कार्यकर्ते आक्रमक, जरांगेंच्या आंदोलनाला विरोध करणाऱ्या डॉक्टराच्या तोंडाला फासले काळे

Maratha Reservation

Maratha Reservation । छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. झुंजार छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी डॉ.रमेश तरख यांच्या तोंडाला काळे फासले आहे. डॉ.रमेश तरख यांनी अंतरवाली सराटी येथील मराठा नेते मनोज जरांगे यांच्या उपोषणाला विरोध केला होता. मराठा नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मराठा आरक्षणासाठी सातत्याने आंदोलन करत आहेत. मनोज जरांगे नुकतेच अंतरवाली सराटी गावात उपोषणाला बसले होते. त्यांनी नंतर उपोषण सोडले असले तरी त्यांनी 13 जुलैची मुदत दिली.

Chandrkant Patil । ब्रेकिंग! मुलींना मिळणार मोफत उच्च शिक्षण, २७ तारखेला निघणार जीआर; चंद्रकांत पाटील यांनी दिली माहिती

आंदोलकांनी तोंडाला काळे फासले

छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाले. आंदोलकांनी डॉ.रमेश तरख यांच्या तोंडाला काळे फासले. मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला विरोध केल्याने आंदोलकांनी डॉ.रमेश तरख यांच्या तोंडाला काळे फासले. अंतरवाली सराटीमध्ये मराठा नेते मनोज जरांगे यांनी केलेल्या आंदोलनाला रमेश तरख यांनी विरोध केला होता. मनोज जरांगे यांच्याविरोधात रमेश तरख यांनी अर्ज दाखल केला होता.

Murlidhar Mohol । पुण्यातील भाजप खासदाराने लोकसभेत मराठीत घेतली शपथ; पाहा व्हिडीओ

दुसरीकडे, ओबीसी नेते आपल्या मागण्यांसाठी आक्रमक होताना दिसत आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे नऊ दिवस उपोषणाला बसले होते. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करत आहेत. मराठा आणि ओबीसी नेत्यांमध्ये सध्या शाब्दिक युद्ध सुरू असतानाच आता छत्रपती संभाजीनगरमधून हि धक्कादायक घटना समोर आली आहे.

Maharashtra ATM Thieves । चोरीचा धक्कादायक प्रकार! चोरट्यांनी पिकअप व्हॅनला ATM बांधून पळ काढला; व्हिडीओ व्हायरल

Spread the love