Manoj Jarange Patil । मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारविरोधात जोरदार आक्रोश केला आहे. त्यांचे नवीन वक्तव्य आणि उपोषणाच्या घोषणा यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की, त्यांनी मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात समाविष्ट करण्याची आणि सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. 16 सप्टेंबर 2024 पासून ते उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली आहे.
Hyundai । ह्युंदाईची ‘ही’ कार खरेदी करताल तर मिळेल 50 हजार रुपयापर्यंत सूट! वाचा संपूर्ण माहिती
अंतरवाली सराटी येथे गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांमुळे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची तीव्रता वाढली आहे. मंत्री अब्दुल सत्तार आणि धनंजय मुंडे यांनी त्यांच्या आंदोलनाशी संबंधित चर्चा केली असून, त्यानंतरच उपोषणाची घोषणा झाली आहे. या चर्चेनंतर, जरांगे पाटील यांनी सरकारला तीव्र संदेश देत सांगितले की, ते आरक्षणासाठी आत्महत्या करणे किंवा शहीद होणे यासही तयार आहेत.
Baramati News । बारामतीच्या राजकारणातून समोर आली सर्वात मोठी बातमी!
मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी मराठा समाजातील तरुणांना आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलणे टाळण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, कोणत्याही परिस्थितीत आत्महत्या करणे हे योग्य नाही आणि सर्वांनी संयम ठेवावा. त्यांच्या या घोषणेत त्यांनी स्पष्ट केले की, आरक्षणाचा प्रश्न लवकरच सुटेल अशी आशा आहे.
Ajit Pawar । “मला मुख्यमंत्रिपद द्या…” अजित पवारांनी अमित शाहांकडे केली मागणी
मनोज जरांगे पाटील यांचे हे धाडसपूर्ण वक्तव्य आणि उपोषणाची घोषणा नेहमीप्रमाणे राज्याच्या राजकारणात तणाव आणि चर्चेला उधाण आले आहे. यामुळे सरकारला लवकरात लवकर ठोस निर्णय घेणे आवश्यक ठरते. त्यांच्या उपोषणामुळे मराठा समाजातील असंतोष आणखी वाढण्याची शक्यता आहे आणि यामुळे राज्यातील राजकीय वातावरणात एक नवीन वळण येईल, हे नक्की.
Crime News | धक्कादायक घटना; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये अवघ्या एक-दीड महिन्याच्या बाळाला टाकून पालक पसार