Manoj Jarange । सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगेंनी फडणवीसांवर पुन्हा केले अतिशय गंभीर आरोप; म्हणाले, ” त्यांना रात्रीच काहीतरी…”

Devendr Fadanvis

Manoj Jarange । मराठा नेते मनोज जरांगे यांनी 17 दिवसांनी उपोषण संपवण्याची घोषणा केली. गावातील महिलांच्या हातने पाणी पिऊन उपोषणाची सांगता केली. आता रुग्णालयात दाखल करून उपचार घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बरे झाल्यानंतर ते पुन्हा एकदा आपल्या समाजातील लोकांमध्ये जाणार आहेत. चर्चेनंतर आंदोलनाची पुढील रूपरेषा ठरवली जाईल, असे ते म्हणाले. यापुढे साखळी उपोषण करणार असल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले आहे.

Pankaj Udhas passed away । संगीत विश्वावर मोठी शोककळा! ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचं निधन

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा अतिशय गंभीर आरोप केले आहेत. “तुम्ही काल जे केलं ते चांगलं केलेलं नाही. तुम्ही रचलेला चक्रव्ह्यू आम्ही तोडला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वप्न होतं की, पुन्हा राज्यात दंगल व्हायला हवी. आम्ही होऊ दिली नाही. असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

Manoj Jarange Patil । कोर्टाचा जरांगे पाटलांना मोठा दणका! सरकारला दिले नवीन आदेश

फडणवीस यांना रात्रीच काहीतरी घडवून आणायचं होतं. लोकं सैरावैरा किती पळाले असते याच त्यांना भान नाही. देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा लाठीचार्ज घडवून आणायचा होता. मात्र मी राज्य बेचिराख होण्यापासून वाचवलं आहे”, असा मोठा दावा मनोज जरांगे यांनी केला.

Maharashtra Politics । निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! बड्या नेत्याने केला शिंदे गटात प्रवेश

Spread the love