Manik Patil । आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या गाडी आणि बंगल्यावर अज्ञातांनी केला हल्ला

Manik Patil Home Attack

Manik Patil । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे माजी नगरसेवक माणिक पाटील यांचे घर आणि गाडीवर काही अज्ञातांनी हल्ला केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. ही घटना कासार वडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. (Manik Patil’s house and car were attacked by some unknown persons)

Maharashtra Corona Update । महाराष्ट्रात गेल्या 24 तासात सापडले तब्बल ‘इतके’ कोरोना रुग्ण; रिपोर्ट चिंता वाढवणारा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 25 डिसेंबर सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली आहे. दिवसाढवळ्या हा हल्ला करण्यात आल्यामुळे सगळीकडे मोठी खळबळ उडाली आहे. अज्ञातांनी माजी नगरसेवक माणिक पाटील यांच्या घर आणि गाडीवर हल्ला केला आणि मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे. आता या प्रकरणी अधिकचा तपास पोलीस यंत्रणा करत आहे. या अज्ञातांचा फक्त तोडफोड करण्याचा उद्देश होता की अजून वेगळा उद्देश्य होता? याबाबत देखील पोलीस यंत्रणा तपास करत आहे.

Mumbai Airport Video । मुंबई विमानतळावरील डोसाची किंमत ऐकून तुम्हालाही बसेल धक्का; पाहा किती आहे किंमत?

मात्र सरकारमध्ये सत्तेत असणाऱ्या पक्षाच्या माजी नगरसेवकाच्या घरावर व गाडीवर असे हल्ले करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्याचबरोबर आरोपींना पोलिसांची भीती राहिली नाही का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. याबाबत अधिकची माहिती अशी की, अज्ञातांनी माणिक पाटील यांच्या बंगल्याच्या खाली उभ्या असलेल्या दोन चार चाकी वाहनांवर हल्ला केला. त्याचबरोबर बंगल्याच्या खिडकीच्या काचावर देखील बॉटल फेकून मारल्या आणि हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.

Salman Khan Birthday । एका चित्रपटासाठी सलमान घेतो ‘इतके’ कोटी रुपये, वाचून बसेल धक्का; मात्र तरीही राहतो १ बीएचके फ्लॅटमध्ये, नेमकं कारण काय?

हल्ला करणारे एकूण चार ते पाच जण असल्याचे सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसत आहे. या अज्ञातांनी नेमका हल्ला कसा केला ही सर्व गोष्ट सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसत आहे. सुदैवाने या हल्ल्यामध्ये बंगल्यातील कोणालाही दुखापत झालेले नाही. मात्र या घटनेमुळे माणिक पाटील यांच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Trending news । गावात शिरला वाघ अन् सगळीकडे गोंधळच गोंधळ, घराच्या भिंतीवर झोपला; काही केल्या हालेना…पाहा थरकाप उडवणारा Video

या प्रकरणामुळे आता पोलिसांनी लवकरात लवकर आरोपीला शोधावं अशी मागणी माणिक पाटील यांनी केली आहे. त्याचबरोबर यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

Spread the love