
Malgegaon Crime News । नाशिकच्या मालेगावमध्ये रविवारी मध्यरात्री गोळीबार झाला आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी माजी महापौर आणि एमआयएमचे महानगर अध्यक्ष अब्दुल मलिक युनूस इसा यांच्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आता या घटनेचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे.
Ghatkopar Hoarding Case । घाटकोपर होर्डिंग घटनेतील आरोपीला मोठा धक्का, कोर्टाने वाढवली पोलिस कोठडी
3 राऊंड गोळीबार, प्रकृती चिंताजनक
अचानक मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी अब्दुल यांच्यावर तीन राऊंड गोळीबार केला. तिन्ही गोळ्या अब्दुल यांना लागल्या. एक गोळी छातीजवळ, एक पायात, तिसरी गोळी शरीराला लागून ती निघून गेली. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या मलिक नाशिक येथील रुग्णालयात दाखल आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेनंतर मालेगावमध्ये तणावाचे वातावरण आहे. या घटनेनंतर एमआयएमचे हजारो कार्यकर्ते रस्त्यावर आले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनास्थळाचा पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.
मालेगावात माजी महापौर आणि एएमआयएमचे महानगर अध्यक्ष अब्दुल मलिक युनूस इसा यांच्यावर गोळीबार…घटनेचे सीसीटीव्ही… pic.twitter.com/Nbuk1k8EKA
— jitendra (@jitendrazavar) May 27, 2024