Malegaon Firing । मागच्या काही दिवसापासून शहरांमध्ये गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पुणे पाठोपाठ नाशिकमध्ये देखील गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. सध्या देखील नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिकच्या मालेगावमध्ये रविवारी मध्यरात्री गोळीबार झाला आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी माजी महापौर आणि एमआयएमचे महानगर अध्यक्ष अब्दुल मलिक युनूस इसा यांच्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Ghatkopar Hoarding Case । घाटकोपर होर्डिंग घटनेतील आरोपीला मोठा धक्का, कोर्टाने वाढवली पोलिस कोठडी
या गोळीबारामध्ये अब्दुल मलिक (Abdul Malik) गंभीर जखमी झाले आहेत. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या हाताला, पायाला तसेच बरगडीत गोळी लागल्याची देखील माहिती मिळत आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर हल्लेखोरांनी धूम ठोकली असून पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी वेगवेगळी पथके रवाना केली आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास अब्दुल मलिक हे मुंबई आग्रा-राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेलवर चहा पिण्यासाठी थांबले होते. यावेळी तीन अज्ञात हल्लेखोर त्या ठिकाणी आले आणि त्यांनी मलिक यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला या गोळीबारात मलिक यांना गंभीर दुखापत झाली, त्यानंतर त्यांना स्थानिकांनी तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.