
आजकाल कुठल्याही महत्त्वाच्या कामासाठी ओळखपत्र मागितले जाते. पॅनकार्ड हे बऱ्याच ठिकाणी ओळखपत्र म्हणून वापरले जाते. आधार कार्ड हे UIDAI कडून जारी केले जाणारे कागदपत्र आहे तर पॅनकार्ड हे इनकम टॅक्स डिपार्टमेंटकडून जारी केले जाते. ITR फाईल करणे असो किंवा बँक अकाउंट असो पॅनकार्ड गरजेचे असतेच. बऱ्याचदा नोकरीच्या ठिकाणी देखील पॅनकार्ड ची गरज पडते. पॅनकार्ड बनवणे हे कटकटीचे काम असते. परंतु तुम्हाला माहित आहे का ? आजकाल घरच्या घरी अगदी ऑनलाईन पध्दतीने पॅनकार्ड बनवून घेता येते.
बिग ब्रेकिंग! राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
ऑनलाइन पॅनकार्ड बनवून घेण्याची पद्धत
1 ) पॅन कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
2) यानंतर क्विक लिंक्स सेक्शनमध्ये जावे लागेल. येथे इंस्टेट पॅन थ्रू आधार पर्याय दिसेल. त्यावर क्लिक
करा.
3)इथे तुम्हाला गेट न्यू पॅनवर क्लिक करावे लागेल. या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल.
4)यावेळी स्क्रीनवर देण्यात आलेला कॅप्चा कोड भरा. यानंतर ओटीपी येईल.
5) हा ओटीपी तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाइल नंबरवरच येईल. यानंतर आलेला ओटीपी भरा.
गोकुळने दूध दरात केली ‘इतक्या’ रुपयांनी वाढ
यानंतर आधारची माहिती मान्य करून ईमेल आयडी द्यावा लागेल. यानंतर आधारची माहिती UIDAI द्वारे एक्सचेंज झाल्यानंतर एक इंस्टंट पॅन कार्ड ( Instant Pan Card) जारी होईल. ही सर्व प्रक्रिया फक्त 10 मिनिटांत पूर्ण होते. या पॅन कार्डला डाउनलोड करण्यासाठी तुम्ही चेक स्टेट्स/डाउनलोड मधून डाउनलोड करू शकतात. हे पॅन कार्ड तुम्हाला पीडीएफ स्वरूपात ईमेलवर देखील येईल. परंतु, यासाठी ईमेल आयडी आधारसोबत लिंक असणे आवश्यक आहे. तसेच हे ऑनलाइन पॅन कार्ड पुढच्या 10 दिवसांत घरच्या पत्त्यावर येते.
Viral Video: हिवाळ्यात अंघोळ करताना थंडी वाजू नये म्हणून पठ्ठ्याने पाण्यातच लावली आग