Maharastra Politics । राज्याच्या राजकारणात मागच्या अनेक दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. राज्याच्या राजकारणात कधी काही होईल याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही. सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील राजकारण राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. सध्या देखील जळगावच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर आली आहे. जळगाव काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष तथा खासदार डॉक्टर उल्हास पाटील (Ulhas Patil) यांना सहा वर्षासाठी पक्षातून निलंबित करण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे.
PM Modi Speech । नरेंद्र मोदी यांनी मागितली प्रभू श्री रामांची माफी; भावुक होत म्हणाले…
डॉ. उल्हास पाटील त्यांच्या पत्नी डॉक्टर वर्षा पाटील या दोघांसह काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे (Devendra Marathe) यांच्यावर काँग्रेस तर्फे निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे जळगावच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावतीने उल्हास पाटील यांच्यासह तिघांना निलंबनाचे पत्र देण्यात आले आहे.
एकाच वेळी तीन बड्या नेत्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या निलंबनानंतर हे बडे नेते आता लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. उल्हास पाटील त्यांची पत्नी वर्षा पाटील आणि कन्या केतकी पाटील हे तिघेही लवकरच भाजपमध्ये प्रवास प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून एका मराठी वृत्तवाहिनीला मिळाली आहे.