Maharashtra Politics । निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकूच्या तारखा जाहीर केल्यापासून राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्व नेत्यांनी आपापल्या मतदारसंघात सभा घेण्यास सुरुवात केली आहे. आगामी निवडणुकीत कोण जिंकेल हे लवकरच स्पष्ट होईल. सध्या महायुतीमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. आज महायुतीकडून कोण कोणत्या मतदारसंघात लढणार आहे हे जाहीर होणार आहे.
Maharashtra Politics । बड्या आमदाराचे उद्धव ठाकरेंबाबत धक्कादायक वक्तव्य; राजकीय वर्तुळात खळबळ
महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिंदे गट आणि अजित पवार गटाने अजूनही जागा जाहीर केल्या नाहीत. दरम्यान आज जागा वाटपाचा तिढा सुटू शकतो. मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील दिल्लीत उपस्थित आहे. त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक सुरू आहे. त्यामुळे मनसे सुद्धा महायुतीचा भाग बनू शकते, अशी चर्चा सुरू आहे. राजकीय दृष्ट्या आजचा दिवस महत्त्वाचा आहे, कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार आले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आठ जागा लढण्यावरून ठाम आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवार गटाला कमी जागा मिळू शकतात. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे निवासस्थानी देखील घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे लोकसभा गटनेते आणि खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी ठाणे येथील निवासस्थानी पोहोचले आहेत. या बैठकीत कोणता निर्णय होईल याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.