Maharashtra Corona Update । धोका वाढला, कोरोना रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्रात झपाट्याने वाढ; पुन्हा लॉकडाऊन?

Maharashtra Corona Update

Maharashtra Corona Update । महाराष्ट्र आणि मुंबईसह संपूर्ण देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. महाराष्ट्रात शनिवारी (23 डिसेंबर) 35 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 103 आहे. यातील सर्वाधिक प्रकरणे राजधानी मुंबईतील आहेत. मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या 52 वर पोहोचली आहे. ठाण्यात 18 आणि पुण्यात 17 सक्रिय प्रकरणे आहेत.

Wedding Viral Video । लग्नात पनीर वरून व्हराडात तुफान हाणामारी; व्हिडीओ व्हायरल

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार पूर्णपणे सतर्क आहे. आरोग्य विभागाला सर्व व्यवस्था सुरळीत ठेवण्यास सांगण्यात आले आहे. बीएमसीने ऑक्सिजन आणि बेड्सबाबतही आपल्या स्तरावर तयारी केली आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचा नवीन प्रकार एन.१ चा रुग्ण आढळून आला आहे. मात्र आता उपचारानंतर तो बरा झाला आहे.

Ajit Pawar । “आम्ही सांगू तेच खरं”, अजित दादांचा पुन्हा राष्ट्रवादीवर दावा

देशातील कोरोनाची स्थिती

गेल्या 24 तासांत भारतात कोविड-19 ची 752 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली असून उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 3,420 वर पोहोचली आहे. 21 मे 2023 नंतर देशात एकाच दिवसात कोरोना विषाणू संसर्गाची नोंद झालेली ही सर्वाधिक संख्या आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंत अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण कोविड-19 रुग्णांची संख्या 4.50 कोटी (4,50,07,964) आहे.

Curative Petition । मोठी बातमी! मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयाने घेतला सर्वात मोठा निर्णय

मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कोविड-19 मुळे गेल्या 24 तासांत केरळमध्ये दोन तर राजस्थान आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, या आजारातून बरे झालेल्या लोकांची संख्या 4,44,71,212 झाली आहे. राष्ट्रीय पुनर्प्राप्ती दर 98.81 टक्के आहे, तर मृत्यू दर 1.19 टक्के आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कोविड-19 विरोधी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात 220.67 कोटी डोस देण्यात आले आहेत.

Ishan Kishan । भारतीय संघाला मोठा झटका! ‘हा’ स्टार खेळाडू घेणार क्रिकेटमधून ब्रेक, धक्कादायक कारण आलं समोर

Spread the love