Madhuri Dixit । माधुरी दीक्षित लढणार लोकसभा निवडणूक? ‘त्या’ भेटीवरून चर्चांना उधाण

Madhuri Dixit will contest the Lok Sabha elections? Discussions about 'that' meeting

Madhuri Dixit । मुंबई : बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित अनेक दिवसांपासून चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. ती सोशल मीडियावरही (Social media) कायम सक्रिय असते. तिचे लाखो चाहते आहेत. सध्या ती एका वेगळ्याच कारणावरून चर्चेत आली आहे. राज्यात लवकरच लोकसभा निवडणुका (Loksabha Election) पार पडणार आहे. यावर्षी माधुरी निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. (Latest Marathi News)

Pandharpur । शंभर तासानंतरही उजनीचे पाणी पंढरपुरात पोहोचले नाही, जाणून घ्या यामागचं कारण

काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी सपत्नीक मुंबईत आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचीही त्यांनी भेट घेतली. यावेळी सागर बंगल्यावर त्यांच्यात आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभा निवडणुकीत माधुरी रिंगणात उतरणार अशा चर्चांना उधाण आले आहे.

Pune News । पुणे परिसरातील घाटातून जात असाल तर सावधान! सलग दुसऱ्या दिवशीही कोसळली दरड

मुंबईतून माधुरी दीक्षित, जळगावमधून प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम, धुळ्यातून प्रतापराव दीघावकर आणि पुण्यातून सुनील देवधर यांना तिकीट देण्यावर या बैठकीत चर्चा झाली असे सांगण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या चौघाजणांशी संपर्क साधून त्यांचे मत जाणून घेतले जाणार आहे. परंतु, यावरून भाजपकडून कोणतीही पुष्टी करण्यात आली नाही.

Nagpur Flood । नागपूरमध्ये 10 हजार घरांत पाणीच पाणी, नुकसानग्रस्तांना मिळणार 50 हजारांची मदत

Spread the love