
LPG Cylinder Price । महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठी घोषणा केली असून त्यात त्यांनी सांगितले की, गॅस सिलिंडरच्या किमती 100 रुपयांनी कमी करण्यात आल्या आहेत. पीएम मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की, आज महिला दिनानिमित्त आम्ही एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांची सूट देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
Lok Sabha Election । अजित पवारांना मोठा धक्का! जवळचा माणूस घड्याळ सोडून तुतारी वाजवणार
यामुळे केवळ महिला शक्तीचे जीवन सुकर होणार नाही तर करोडो कुटुंबांचा आर्थिक भारही कमी होईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. त्यामुळे आता घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती 100 रुपयांनी कमी केल्यानंतर तुम्हाला 800 रुपयांपर्यंत सिलिंडर मिळणार आहे. सरकारच्या घोषणेसह, या नवीन सिलिंडरच्या किमती देखील लागू होतील, याचा अर्थ तुम्ही आता बुक कराल त्या सिलिंडरसाठी तुम्हाला 100 रुपये कमी द्यावे लागतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये मोठी कपात करण्याची घोषणा केली. यामुळे महागाईने पिचलेल्या जनेतला काही प्रमाणात दिलासा मिळेल.