Maharashtra Politics । निवडणुकीपूर्वीच काँग्रेसच्या वाढल्या अडचणी! बड्या नेत्याने घेतला अपक्ष लढण्याचा निर्णय

Maharashtra Politics

Maharashtra Politics । ऐन निवडणूक (Loksabha election 2024) काळात राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला (Congress) गळती लागली आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण पक्षातील अनेक बड्या नेत्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला सतत धक्क्यांवर धक्के बसत आहेत. अशातच काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. (Latest marathi news)

Nawab Malik । बिग ब्रेकिंग! नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली, तातडीने केले रुग्णालयात दाखल

रामटेक लोकसभा मतदारसंघातील (Ramtek Lok Sabha Constituency) आता काँग्रेसचे नेते असलेले किशोर गजभिये (Kishore Gajbhiye) यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ते लवकर राजीनामा देणार आहेत. “रामटेक लोकसभा मतदारसंघातून मी माझा उमेदवारी अर्ज भरला होता आणि हा अर्ज स्विकृत झाला आहे. निवडणूक चिन्हही मला मिळालं आहे. जे मुक्त चिन्ह आहेत त्यातील प्रेशर कुकर हे चिन्ह मला मिळालं आहे,” असे स्पष्टीकरण किशोर गजभिये यांनी दिले आहे.

Maharashtra Politics । काँग्रेसला भलंमोठं खिंडार! लोकसभेच्या तोंडावर माजी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सूनेने केला भाजपमध्ये प्रवेश

दरम्यान, नुकताच रश्मी बर्वे या जात प्रमाणतपत्र पडताळणीत अपात्र ठरल्या असून त्यांचा उमेदवारी अर्ज देखील बाद झाला आहे. त्यानंतर आता किशोर गजभिये यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता काँग्रेसला लोकसभा निवडणुकीपूर्वी खूप मोठा धक्का बसला असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Congress । मोठी बातमी! काँग्रेसचा बडा नेता भाजपच्या वाटेवर, भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ

Spread the love