
अभिनेत्री कंगना रनौत (Kangna Ranuat) तिच्या विविध वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. नुकतेच तिने तिच्या अगामी ‘इमर्जन्सी’ (Emergency Movie) या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. या पार्श्वभूमीवर तिने सोशल मीडियावर भलीमोठी भावनिक पोस्ट टाकली आहे. यामध्ये तिने ‘इमर्जन्सी’ चित्रपटासाठी आपली मालमत्ता गहाण ठेवली असल्याचा दावा केला आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाउंट वर चित्रीकरणाचे फोटो पोस्ट करत तिने बरीच माहिती दिली आहे.
इमर्जन्सी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान कंगनाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. या चित्रपटाच्या पहिल्या शेड्युल मध्ये कंगनाला आपली मालमत्ता गहाण ठेवावी लागली. इतकंच नाही तर याकाळात डेंग्युचा देखील सामना करावा लागला. ‘शरीरात रक्त कमी असताना चित्रीकरण करणे ही माझी कठोर परीक्षा होती. असे कंगनाने पोस्टमध्ये सांगितले आहे.
धक्कादायक! तरुणाने विवाहितेवर केला बलात्कार वरून म्हणाला की, आमचे हेच काम आहे…
या पोस्ट मध्ये तिने असेही लिहिले आहे की, मला विनाकारण चिंता करणारे किंवा खाली ओढणारे लोक नको होते. यासाठी मी आजपर्यंत हे सर्व शेअर केले न्हवते. तुम्ही जर सक्षम असाल, तर तुमच्या मर्यादेपेक्षा जास्त तुमची चाचणी घेतली जाईल. मात्र, तुम्ही तुटून जाऊ नका. जोपर्यंत शक्य असेल तोपर्यंत स्वतःला धरून ठेवा.
अशी झाली लक्ष्या आणि महेशची दोस्ती! कोठारेंच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात आठवणींना उजाळा
हा चित्रपट आणि काळ माझ्यासाठी पुनर्जन्म आहे आणि मी आधी कधीच जिवंत नव्हते असं मला वाटत आहे. मी सध्या सुरक्षित असून माझी काळजी करू नका. मला आता फक्त तुमच्या आशीर्वाद आणि प्रेमाची गरज आहे. असे कंगनाने म्हंटले आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
कांद्यावर रोग आलाय? टाक्या किडीने पिकाचे नुकसान होत आहे… तर चिंता करू नका; ‘हे’ उपाय करून पहा