
प्रत्येकजण आपल्या लुक्स बाबत म्हणजेच दिसण्याबाबत प्रचंड जागरूक असतो. आपण चांगले दिसावेत यासाठी लोक विविध प्रयत्न करतात. त्यातल्या त्यात त्वचेची आणि केसांची तर विशेष काळजी घेतली जाते. दरम्यान हाताचे कोपरे काळे पडतात. हा काळेपणा दूर करण्यासाठी लोक हर एक प्रयत्न करत असतात. यासाठी बऱ्याचदा महागड्या क्रीम्स व लोशन्स वापरले जाते. परंतु काही आयुर्वेदिक पद्धतींनी तुम्ही पैसे खर्च न करता या हाताच्या कोपराच्या व गुडघ्याच्या काळेपणापासून (Darkness of skin) सुटका मिळवू शकता.
1) लिंबाचा रस
लिंबामध्ये असणारे सायट्रिक ऍसिड त्वचेचा काळेपणा दूर करण्यासाठी मदत करते. दरम्यान हाताच्या कोपऱ्याचा व गुडघ्याचा काळेपणा दूर करण्यासाठी तुम्हाला हातांच्या कोपरावर व गुडघ्यावर 10 ते 15 मिनिटे लिंबाचा रस लावून ठेवावा लागेल. यानंतर स्वच्छ पाण्याने हात व गुडघे धुवा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा असे केल्याने कोपऱ्याचा काळेपणा दूर होतो.
2) खोबरेल तेल
खोबरेल तेलाने ( coconut Oil) त्वचेचा टोन सुधारतो. यामुळे हाताच्या व पायांच्या कोपऱ्यांचा काळेपणा दूर करण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर करावा. यासाठी तुम्हाला काही मिनिटे खोबरेल तेल लावून मसाज करावा लागेल. असे सतत केल्यास हाताच्या कोपरांचा व गुडघ्यांचा काळसरपणा कमी होईल.
3) कोरफड
कोरफडीमध्ये ( Alovera) अँटिबॅक्टरियल आणि अँटिफंगल गुणधर्म असतात. यामुळे त्वचेचा काळेपणा दूर करण्यास मदत होते. कोपऱ्यावरील काळेपणा दूर करण्यासाठी कोरफडीचा गर किंवा एलोवेरा जेल लावावे लागेल. नियमित कोरफडीचा वापर केल्याने कोपऱ्याचा व गुडघ्याचा काळेपणा हळूहळू कमी होतो.