Independence Day । सरकारचा मोठा निर्णय! 15 ऑगस्टपासून सरकारी रुग्णालयांमध्ये सर्व वैद्यकीय सेवा मोफत

Independence Day. Big decision of the government! All medical services free in government hospitals from August 15

Independence Day । राज्यातील गरीब लोकांना सरकारी रुग्णालयामध्ये उपचार घेणे एकदम योग्य वाटते कारण की गरिबांकडे खाजगी रुग्णालयांमध्ये खर्च करण्या एवढे पैसे नसतात. त्यामुळे सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार घेणे परवडते. सध्या आता त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सरकारी रुग्णालयामध्ये प्रत्येक वैद्यकीय सेवा मोफत उपलब्ध होणार असल्याची माहिती समोर आली आह. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी याबाबत माहिती दिली आहे.

राजकीय हालचालींना वेग! शरद पवार आणि अजित पवारांची गुप्त बैठक

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, “सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रूग्णालयात रुग्णांना देण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वैद्यकीयसेवा येत्या १५ ऑगस्टपासून नि:शुल्क उपलब्ध हाेणार आहेत. मंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना नि:शुल्क उपचार मिळणार आहेत.

flooded । पूरग्रस्त भागातील शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत; लवकर मदत जाहीर केली नाही तर आंदोलनाचा इशारा

आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना निशुल्क उपचार मिळावेत यासाठी तानाजी सावंत यांनी पाठपुरावा केला होता अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ITR Filing 2023 । करदात्यांना मोठा झटका! वेळेत ITR दाखल केला तरीही भरावा लागणार 5,000 रुपये दंड, जाणून घ्या यामागचं कारण

Spread the love