ITR Filing 2023 । अनेक नोकरदारवर्ग आयकर (Income tax) भरत असतात. काहीजण कर चुकवतात. त्यामुळे त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. आर्थिक वर्ष 2022-23 आणि मूल्यांकन वर्ष 2023-24 साठी आयकर रिटर्न दाखल करण्याची शेवटची मुदत 31 जुलै 2023 ही होती. महत्त्वाचे म्हणजे अनेक करदात्यांनी आयटीआर (ITR) भरलेला नाही. त्यामुळे त्यांचे नुकसान होणार आहे. (Latest Marathi News)
परंतु आता जर तुम्ही ITR भरला असेल तरीही तुम्हाला 5,000 रुपये दंड म्हणून भरावा लागणार आहे. आयटीआर दाखल (ITR Filing) करताना त्याची पडताळणी करणे खूप महत्त्वाचे आहे. अनेकदा करदाते पडताळणी करत नाहीत. जर तुम्हीही असे केले असेल तर लवकरात लवकर पडताळणी करा, नाहीतर तुम्हाला आर्थिक ताण येईल.
Virat Kohli । इंस्टाग्राम कमाईवर विराट कोहलीने दिली प्रतिक्रिया; म्हणाला, “मी इतके पैसे…”
हे लक्षात घ्या की, ITR दाखल केल्यानंतर त्याच्या पडताळणीसाठी 30 दिवसांचा अवधी मिळतो. तुम्ही या कालावधीत ITR ची पडताळणी करू शकता. जर तुम्ही या वेळेत पडताळणी केली नाही तर तुम्हाला परतावा देखील मिळणार नाही. शिवाय तुम्हाला 5,000 रुपयांचा दंडही भरावा लागू शकतो. त्यामुळे आजच पडताळणी करून घ्या.
Sanjay Raut । नवाब मलिकांना जामीन कसा मिळाला? राऊत म्हणाले, नवीन इंजेक्शन घेतले …