Petrol Diesel Price Today । सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, जाणून घ्या नवीनतम दर

Petrol Diesel Price Today

Petrol Diesel Price Today । तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर (Petrol Diesel Price) जाहीर करत असते. राज्यात पेट्रोलने शंभरी पार केली आहे तर डिझेलच्या देखील किमतीत खूप वाढ झाली आहे. याचा परिणाम सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागत आहे. अशातच लोकसभा निवडणुकीपूर्वी पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Rate) कमी होऊ शकतात, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Congress । ब्रेकिंग! काँग्रेसचा बडा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश

अशातच आता सर्वसामान्यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे. कारण आज आंतरराष्ट्रीय बाजारात अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत थोडी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आजही भारतीय तेल विपणन कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 27 पैशांनी वाढ (Petrol Diesel Price Hike) झाल्याचे पाहायला मिळत आहे. (Diesel Price Hike)

Manoj Jarange Patil । सर्वात मोठी बातमी! जरांगे पाटलांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल, नेमकं कारण काय? जाणून घ्या

पुणे शहरात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 105.84 रुपये तर डिझेलचा दर 92.36 रुपये प्रतिलिटर, मुंबई शहरात पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर, नाशिकमध्ये पेट्रोल 106.42 रुपये प्रतिलिटर आणि डिझेल 92.93 रुपये प्रतिलिटर, तर नागपुरात पेट्रोलचा दर 106.07 रुपये तर डिझेलचा दर 92.62 रुपये प्रतिलिटर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल १०९.०३ रुपये दराने आणि डिझेल 95.71 रुपये प्रति लीटर दराने मिळत आहे. छत्तीसगड, झारखंड आणि गुजरात या काही राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या आहेत.

Ajit Pawar । ब्रेकिंग! अजित पवारांना सर्वात मोठा धक्का; कट्टर समर्थकाने दिला तडकाफडकी राजीनामा

Spread the love