कसबा पोटनिवडणुकीत एकनाथ शिंदे रात्री 8 वाजेपर्यंत पैसे वाटत फिरत होते; रवींद्र धंगेकरांनी केली गुन्हा दाखल करण्याची मागणी

In the Kasba by-election, Eknath Shinde was walking around asking for money till 8 pm; Ravindra Dhangekar demanded to file a case

पुण्यात मागचे काही दिवस चिंचवड व कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचे वारे वाहत होते. कसबा मतदार संघातील दिवंगत आमदार मुक्ता टिळक व चिंचवड मतदारसंघातील दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त जागांसाठी या ठिकणी पोटनिवडणूका जाहीर झाल्या होत्या. यामध्ये भाजप व महाविकास आघाडीमध्ये चांगलीच चढाओढ लागली आहे. दरम्यान पोटनिवडणुकीची मतदान प्रक्रिया काल (दि.26)पार पडली. मात्र मतदान होऊन देखील कसबा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापले आहे.

ऊस राहतोय का काय? या भीतीपोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची होतेय लूट

भाजपा उमेदवार हेमंत रासने ( Hemant Rasne) यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कसबा मतदारसंघात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप रासने यांच्यावर करण्यात आला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी हा आरोप केलाय. इतकंच नाही तर यासाठी ते कसबा पेठ गणपती समोर उपोषणाला देखील बसले होते. मात्र आचारसंहिता सुरू असताना उपोषणाला बसल्या प्रसंगी आता धंगेकरांवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सत्यजीत तांबे पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार?; स्वतःच केला याबाबत मोठा खुलासा, म्हणाले…

अशातच रवींद्र धंगेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. निवडणूक प्रचार संपल्यानंतर रात्री 8 वाजेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पैसे वाटत फिरत होते. यावेळी चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकर देखील उपस्थित होते. माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. म्हणून आता त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा.असे रवींद्र धंगेकर म्हणाले आहेत.

शरद पवार यांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या ‘या’ जवळच्या विश्वासू नेत्याने दिला राजीनामा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *