
मागच्या काही महिन्यापूर्वी श्रद्धा वालकर या तरुणीची आफताब पूनावाला या तरुणाने हत्या केली होती. हत्या केल्यानंतर आफताबने श्राद्धाच्या शरीराचे तुकडे वेगेवेगळ्या भागामध्ये फेकले होते. यामुळे या घटनेने संपूर्ण देशाला हादरून टाकले होते. आता या हत्याकांड प्रकरणात आरोपी आफताब पूनावालाला आज कोर्टात दाखल करण्यात आलं होतं.
धुलिवंदनानिमित्त जावयाची गाढवावर बसून काढली जंगी मिरवणूक
आज आफताबला कोर्टात दाखल केले त्यावेळी दिल्ली पोलिसांनी कोर्टामध्ये काही महत्वाची माहिती सांगितली आहे. कोर्टाने सांगितले की, आफताब पूनावाला हा एक ट्रेन्ड शेफ असून त्याला मांसाचे तुकडे केल्यानंतर ते जतन करून कसे ठेवायचे याबाबदल सर्व माहिती आहे. त्यामुळे श्रद्धाच्या हत्येननंतर त्याने मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये साठवले होते आणि एक एक करून तो तुकडे फेकून देत होता असं यावेळी पोलिसांनी सांगितलं आहे.
धुलिवंदनानिमित्त जावयाची गाढवावर बसून काढली जंगी मिरवणूक
आज आफताब पूनावाला याला दिल्लीमधील साकेत कोर्टामध्ये हजर करण्यात आले होते त्यावेळी दिल्ली पोलिसांनी ही माहिती दिली. त्याचबरोबर माहिती देताना पोलिसांनी पुढे म्हंटले आहे की, आफताब हा ताज हॉटेलमध्ये काम करणारा प्रशिक्षित शेफ असून त्याला माहित आहे की तुकडे केल्यानंतर मांस कसं जतन करतात. त्यामुळे त्याने श्रद्धाची हत्या केली त्यावेळी ड्राय आईस, उदबत्त्या हे सगळं ऑनलाइन पद्धतीने मागवलं होतं. अशी देखील माहिती पोलिसांनी दिली आहे.
‘या’ गावात होळीनिमित्त मुलाचे मुलाशीच लावले जाते लग्न; जाणून घ्या या विचित्र प्रथेबद्दल सविस्तर…