“मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास नाही”, संजय राऊतांचे मोठे वक्तव्य

"I don't trust Chief Minister Eknath Shinde", Sanjay Raut's big statement

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये दौंडमधील भीमा सहकारी साखर कारखान्यात ५०० कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर या प्रकरणामध्ये शेतकऱ्यांची लूट झाली असून निःपक्ष चौकशीची मागणी देखील संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे.

शेतकरी आजींनी यूट्यूबवरून कमावले लाखो रुपये; अन् आजींचा पहिला वहिला विमान प्रवास होतोय व्हायरल

यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. संजय राऊत म्हणाले, “राहुल कुल यांच्यासोबत माझे कोणतेही वैर नाही हे प्रकरण माझ्या समोर आलं आहे म्हणून मी यासंबधी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहल आहे. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास नाही. मला फडणवीसांवर विश्वास असल्याचं राऊत यावेळी म्हणाले आहेत.

दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यावर 500 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप; राऊतांचे थेट फडणवीसांना पत्र

फडणवीसांना पाठवलेल्या पत्रात नेमकं काय म्हंटल आहे संजय राऊतांनी?

आपल्या नेतृत्वाखालील सरकारने सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचार खणून काढण्याचे ठरवले आहे व त्याबद्दल आपले अभिनंदन. भारतीय जनता पक्षाचे काही नेते जे आपल्या अंतस्थ गोटात वावरत असतात, ते सातत्याने प्रमुख विरोधी पक्षांचे व्यवहार, त्यांचे साखर कारखाने याबाबत भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आणत आहेत व या नेत्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिराही लावला जातो. भ्रष्टाचारास धर्म व राजकीय पक्ष नसतो. असं संजय राऊत म्हणाले आहेत.

त्याचबरोबर ते म्हणाले, त्यामुळे भ्रष्टाचाराची वाळवी नष्ट होणे गरजेचे आहे. या मताचा मी आहे. पुणे जिल्ह्यातील तालुका दौंड येथील भीमा सहकारी साखर कारखाना लि. ने गेल्या काही वर्षांत केलेल्या भ्रष्टाचार गैरव्यवहाराचे प्रकरण म्हणजे सरळ सरळ अंदाजे ५०० कोटी रुपयांचे ‘मनी लाँडरिंग आहे. कोल्हापुरातील आमदार हसन मुश्रीफ यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे प्रकरण सध्या चर्चेत आहे व तपास यंत्रणांच्या धाडी त्या संदर्भात पडत आहेत. पण दौडच्या भीमा सहकारी साखर कारखान्यातील शेकडो कोटींचा गैरव्यवहार यापेक्षा भयंकर आहे व या भ्रष्टाचारास राजकीय संरक्षण मिळत असेल तर ते गंभीर आहे.

भाजपच्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेचे मुख्य सुत्रधार श्री. किरीट सोमय्या यांच्या स्वतंत्र यंत्रणेमार्फत आपण भीमा सहकारी साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराची माहिती घेऊ शकता. त्यांच्या कार्यालयात हे प्रकरण संबंधित तक्रारदार घेऊन गेले आहेत. पण किरीट सोमय्या त्या भ्रष्टाचारावर मूग गिळून बसलेत जनतेच्या पैशांची प्रचंड लुटमार या कारखान्यात झाली आहे. हे सर्व प्रकरण तत्काळ ‘ईडी’ व ‘सीबीआयच्या ताब्यात देऊन भीमा सहकारी साखर कारखान्यात घोटाळा करणाऱ्यांवर कारवाई करावी. या प्रकरणाचा सविस्तर तपशील सोबत जोडत आहे. अशी मागणी देखील राऊतांनी यावेळी केली आहे.

रिल्सचा नाद पडला महागात! धरणावर व्हिडीओ काढायला गेला अन्…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker extensions or Software for www.elokhit.com.