Hiradgaon News । शालेय पोषण आहारात त्रुटी; हिरडगाव शाळेतील मसाले कालबाह्य

Hiradgaon News

Hiradgaon News । हिरडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय पोषण आहारात गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. आमदार विक्रम पाचपुते यांच्या भेटीत ही बाब उघडकीस आली. विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी शाळेत आलेल्या पाचपुते यांनी जेवणाची वेळ असल्याने पोषण आहाराची पाहणी केली. यावेळी काही मसाले कालबाह्य (expired) असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

पोषण आहार हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक असूनही त्यात हलगर्जीपणा होत असल्याचे या प्रकारावरून स्पष्ट झाले आहे. जेवणात वापरले जाणारे मसाले व इतर साहित्य दर्जेदार आणि ताजे असावे, यासाठी शासन वेळोवेळी नियमावली जाहीर करते. मात्र, हिरडगाव शाळेत या नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसून आले.

पाहणी दरम्यान आमदार पाचपुते यांनी संबंधित शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती आणि पुरवठादार यांच्याकडे या त्रुटींबाबत जाब विचारला. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ मुळीच सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी यावेळी दिला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आहाराकडे योग्य लक्ष्य द्या असे त्यांनी सांगितले.

याबाबत मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, कालबाह्य मसाले विद्यार्थ्यांच्या आहारात वापरले जात नसून ते बाजूला ठेवण्यात आले होते.

Spread the love