Health Updates | जेवणाची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या सविस्तर

Health Updates | What is the right time to eat? Know in detail

‘आरोग्य हीच संपत्ती’ ( Health is wealth) असे म्हंटले जाते. मात्र निरोगी आरोग्यासाठी आहारही तितकाच महत्त्वाचा असतो. बरं, फक्त आहार घेतला म्हणून माणूस निरोगी राहतो का? तर, नाही! संतुलित व वेळेत आहार घेतल्याने माणूस सुदृढ राहतो. तुम्ही योग्य वेळेला, योग्य प्रमाणात, योग्य आहार घेत असाल तरच तुम्ही निरोगी राहू शकता. परंतु, सध्याच्या धावपळीच्या युगात वेळेत जेवण करता येत नाही. गडबडीत जेवणाच्या वेळा बदलत राहतात. यामुळे आरोग्याचे भयंकर नुकसान होते.

गौतमी पाटीलची राजकारणात चर्चा! अजित पवारांनंतर आता अब्दुल सत्तारही म्हणाले की…

जेवणाच्या वेळेचा परिणाम जेवणाच्या पचनावर होतो. ( perfect time meal) यामुळे शरीराचा समतोल ढासळतो. त्यामुळे योग्य वेळेत जेवण करणे आवश्यक आहे. मात्र, जेवणाची योग्य वेळ कोणती? जेवणाची निश्चित वेळ ठरवण्याबाबत माहिती खालीलप्रमाणे :

तुम्हीही Swiggy वरून ऑनलाईन जेवण मागवताय? तर मग ही बातमी तुमच्यासाठी…

१) रात्रीचे जेवण ( Dinner) आणि सकाळचे जेवण यामध्ये १२ तासांचे अंतर आवश्यक आहे. म्हणजेच तुम्ही रात्री ८ वाजता जेवलात, तर नाश्ता सकाळी ८-९ च्या दरम्यान नाश्ता करू शकता. कारण हॉर्मोन्स आणि पचन प्रक्रियांचे नियमन होण्यासाठी रात्रीच्या जेवणानंतर १२ तासांचे अंतर आवश्यक लागते.

२) जेवणाचे घड्याळ व्यवस्थित रहावे यासाठी सकाळी लवकर उठणे आवश्यक आहे. सकाळी लवकर उठल्यास तुम्ही ८-९ च्या दरम्यान नाश्ता करू शकता. यावेळी हलका आहार घ्यावा. ( Breakfast Time)

३) यानंतर दुपारी २-३ च्या दरम्यान तुम्ही जेवण करू शकता. यावेळी पोटभर अन्न खाणे आवश्यक असते. (Lunch)

गुलाबजाम घरी घेऊन जाण्यावरून लग्नात नातेवाईकांमध्ये वाद; झाली तुफान मारामारी

खरंतर भूक ठरवण्यात घ्रेलिन हार्मोन महत्त्वाची भूमिका बजावते. हे हार्मोन भूक लागल्याचे सांगून जेवणाची वेळ निश्चित करते. मात्र भूक लागूनही उशिरा जेवणाची सवय लागली की, शारीरिक समतोल बिघडतो. याचे दुष्परिणाम आरोग्यावर होतात.

Uorfi Jawed: उर्फी जावेदची संपत्ती ऐकून बसेल धक्का; महिन्याला कमावते इतके रुपये

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *