Health News । सध्या सर्वच वयोगटातील लोकांना होणारा त्रास म्हणजे छातीत जळजळ करणे. सध्या अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा त्रास होताना आपल्याला दिसून येत आहे. छातीत जळजळ करणे म्हणजेच अँसिड रिफ्लक्स होणे होय. ही एक प्रकारची पचन समस्या आहे.
या त्रासापासून मुक्त होण्यासाठी अनेकजण अनेक उपाय करत असतात. काही लोक यापासून मुक्तता मिळावी म्हणून नैसर्गिक उपाय देखील शोधत आहेत आणि यामुळेच सध्या इंस्टाग्रामवरील एका व्हिडिओकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
इंस्टाग्रामवरील कंटेंट क्रिएटर कीर्ती तेवाणी यांनी याबाबत एक उपाय सुचवलेला आहे. याचा व्हिडिओ त्यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या रीलच्या माध्यमातून त्यांनी सांगितले आहे की, जर तुम्हाला छातीत जळजळ होण्याचा त्रास असेल तर एक चमचा धणे भिजवून त्याचे पाणी प्या . यामुळे आता खरच धने खाल्ल्यानंतर हा त्रास थांबू शकतो का या चर्चांना उधाण आले आहे.
Daund News । दौंड तालुक्यात शिक्षकाकडून विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; गावात संतापाची लाट
‘द इंडियन एक्स्प्रेस’ला माहिती देताना सल्लागार आहारतज्ज्ञ आणि प्रमाणित मधुमेह शिक्षक कनिक्का मल्होत्रा यांनी याबाबत सांगितले आहे की, धन्याचे पाणी हे पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत करते. अपचन आणि सूज कमी करण्यास देखील याचा फायदा होतो. परंतु छातीत होणारी जळजळ कमी करण्यास त्याचा प्रभाव कमी असून धन्याचे पाणी हे पाचक एन्झाइम्सना उत्तेजीत करतात.
Sharad Pawar । झेड प्लस सुरक्षेबाबत शरद पवारांचे सर्वात मोठे वक्तव्य!
दरम्यान, धन्याच्या पाण्याचे अनेक फायदे असून या पाण्याचे सेवन दिवसभरात कधीही केले जाऊ शकते. असे मुंबई येथील सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या क्लिनिकल डायटीशिअन वेदिका प्रेमानी यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला माहिती देताना सांगितलेले आहे.
Ola ने लाँच केली पहिली Electric Bike, एकाच चार्जमध्ये मुंबई ते पुणे प्रवास शक्य!