Havaman Andaj । सर्वात मोठी बातमी! ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाने दिला इशारा

Rain

Havaman Andaj । महाराष्ट्रात मोसमी पाऊस पडत आहे. हवामान खात्याने २४ तासांत राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईतही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज सकाळपासूनच अनेक भागात आकाश ढगाळ होते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईच्या मरिन ड्राइव्हवरही भरतीचा धोका निर्माण झाला आहे. टी-२० विश्वचषक जिंकून टीम इंडिया आज भारतात परतली आहे. टीम इंडियाचा मुंबईत संध्याकाळी 5 वाजता रोड शो आहे.

Politics News । महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ, शिंदे आणि ठाकरे गटातील नेत्यांची ‘गुप्त’ बैठक

जुलै महिना सुरू होताच मान्सूनने देशभर हजेरी लावली आहे. यापूर्वी जूनमध्येच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला होता. त्यानंतर मुंबई उपनगरासह संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबई-ठाण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून, त्यासाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Kolhapur News । संपूर्ण गावावर मोठी शोककळा! शेतात काम करताना विजेचा धक्का लागून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रात आपत्ती ठरत आहे. पावसामुळे वातावरण आल्हाददायक झाले असले तरी अनेक भागात पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली आहे. IMD नुसार, राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, नागपूर, अकोला, अमरावती, गडचिरोली, गोंदिया येथे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय राज्यातील इतर अनेक जिल्ह्यांमध्येही सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडू शकतो.

Bhushi Dam Incident । ब्रेकिंग! भुशी धरणातील मृतांच्या नातेवाईकांना मिळणार ५ लाखांची मदत; सरकारची घोषणा

Spread the love