Gunaratna Sadavarte । जरांगे पाटलांना अटक करा, हीच का तुमच्या शांततामय आंदोलनाची व्याख्या; गुणरत्न सदावर्ते कडाडले

Gunaratna Sadavarte

Gunaratna Sadavarte । मराठा क्रांती मोर्चाच्या काही कार्यकर्त्यांनी थेट प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांना दणका दिला आहे. या तरुणांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. मराठा तरुणांनी आज सकाळच्या सुमारास त्यांच्या घराकडे जाऊन ही तोडफोड केली आहे.

Gunaratna Sadavarte । प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची मोठी तोडफोड; मराठा तरुणांचा मोठा दणका

गुणरत्न सदावर्ते हे क्रिस्टल टॉवर या ठिकाणी राहत असून त्यांच्या पार्किंग मध्ये असलेल्या वाहनांची मराठा क्रांती मोर्चाच्या तीन कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. हे तरुण हातात काठी घेऊन आले आणि बेधडकपणे त्यांच्या दोन गाड्यांच्या काचा फोडल्या तरुण अत्यंत आक्रमक झाले असून त्यांनी मोठ्या प्रमाणात वाहनांची तोडफोड केली आहे. त्याचबरोबर यावेळी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देखील देण्यात आल्या आहेत. यानंतर सदावर्ते यांनी संताप व्यक्त केला आहे.

Narendra Modi | सरकाकडून शेतकऱ्यांना दिवाळीचे गिफ्ट! नमो शेतकरी महासन्मान योजनेचे जमा होणार पैसे

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या शांततामय आंदोलनाची हीच व्याख्या आहे का? असा सवाल करत मनोज जरांगे यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही मागणी केली आहे. वाहनांची तोडफोड झाल्यानंतर गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी वाहनांची पाहणी केली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी माध्यमांशी संवाद साधताना प्रचंड संताप व्यक्त केला.

Bus Accident । सर्वात मोठी बातमी! दसरा मेळाव्यावरून परतणाऱ्या शिंदे गटाच्या बसला भीषण अपघात; 25 जण जखमी

Spread the love