Gopichand Padalkar । धनगर आरक्षणाबाबत गोपीचंद पडळकर यांनी केली सर्वात मोठी घोषणा!

Gopichand Padalkar

Gopichand Padalkar । आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज आक्रमक झालेला असतानाच आता धनगर समाज देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर आपल्या सरकारच्या विरोधात दंड थोपटले आहेत. माझा सरकारला अल्टिमेट आहे तुम्ही काही करा पण धनगरांना एसटीतून आरक्षण द्या अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

Dhangar Reservation । धक्कादायक! मराठा आरक्षणानंतर धनगर आरक्षणासाठी तरुणाने गळफास घेत केली आत्महत्या

सांगली (sangli) या ठिकाणी धनगर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गोपीचंद पडळकर बोलत होते. पण यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर यांनी एका नव्या संघटनेची स्थापना केल्याची माहिती देखील दिली आहे. हिंदुस्तान शिव मल्हार क्रांती सेनेची गोपीचंद पडळकर यांनी स्थापना केली आहे. ही संघटना अराजकीय संघटना असेल फक्त मेंढपाळ समाजासाठी ही संघटना काम करणार असल्याची घोषणा गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

Ajit Pawar । अजित पवारांचं मराठा आरक्षणाबाबत मोठे वक्तव्य; म्हणाले, “मागण्या टाळतोय…”

ज्यावेळी 1990 ला शरद पवार मुख्यमंत्री होते त्यावेळी धनगर समाजाला आरक्षण मिळाले असते. मात्र तसे झाले नाही पण आता धनगरांना आरक्षणाच्या आड कोणी आला तर त्याला तुडवू, असा गंभीर इशारा देखील यावेळी गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.

Bjp । भाजपला सर्वात मोठा धक्का; बड्या नेत्याने पक्षाला ठोकला रामराम

Spread the love