Google Takeout मुळे डेटा ट्रान्सफर होणार सोप्पे; मात्र Google Takeout म्हणजे नक्की काय? जाणून घ्या याबद्दल सविस्तर

Google Takeout makes data transfer easy; But what exactly is Google Takeout? Learn more about it

जगातील सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन म्हणून गूगलला ओळखले जाते. गूगलचे इतर फिचर्स देखील लोकांना ( Google) आकर्षित करणारे आहेत. दरम्यान गूगल आपल्या सेवांमध्ये सतत काही ना काही अपडेट करत असते. गूगल फोटोजमध्ये अनलिमिटेड डेटा अपलोड करण्याची सुविधा मध्यंतरी या कंपनीने आणली होती. मात्र 15 जीबी पेक्षा जास्त डेटा असेल तर कंपनीकडून पैसे घेतले जात होते.

हार्टअटॅक येण्याआधी सिग्नल भेटतो थेट डोळ्यांमध्ये, हृदय आणि डोळ्यांचे असते ‘हे’ कनेक्शन; वेळीच उपचार घ्या नाहीतर…

हे पैसे वाचले जावे यासाठी बरेच युजर्स डेटा ट्रान्सफर करत होते. या सगळ्यावर गूगलने एक जबरदस्त उपाय शोधून काढला असून त्याचे नाव गूगल टेकआउट आहे. ही गूगलची एक अशी सेवा आहे, ज्यामध्ये तुमच्या गूगल खात्यामधील एकापेक्षा जास्त अॅप्समधून डेटा निवडण्याची आणि ट्रान्सफर करण्याची परवानगी देते. गुगल ड्राईव्हच्या फाइल्स, कॉन्टॅक्ट्स, यूट्यूबचे व्हिडीओ आणि मुख्य म्हणजे ‘गुगल फोटोज’ मधून तुमचे सर्व फोटो तुम्ही यामध्ये डाऊनलोड आणि सेव्ह करू शकता.

भारत आणि पाकिस्तानच्या महिला क्रिकेटपटूंमधील वेतनाचा फरक वाचून तुम्हीही व्हाल थक्क!

Google Takeout चा वापर असा करा

1) सर्वात आधी तुमचे गूगल अकाऊंट लॉगिन करा
2)यानंतर takeout.google.com वर लॉगिन करा.
3) तसेच हव्या त्या अँप मधील हवी ती फाईल निवडा
4) दरम्यान, zip फाइल्स किंवा tgz फाइल्समधून फोटोसाठी एक फॉरमॅट निवडावा लागेल.
5) आता ‘Create Export’ वर क्लिक करा.
6) त्यानंतर ओळखीची प्रक्रिया सुरू होऊन तुमच्या खात्यावर मेल पाठवला जाईल.An archive of Google data has been requested असा तो मेल असेल.
7) यावरून तुम्ही परवानगी दिली की, गुगल तुमचा सर्व डेटा तुमच्या खात्यावर पाठवेल.

नाद करा पण आमचा कुठं! भाव न मिळणाऱ्या पिकात रोटर फिरवण्यास अनुदान द्या; शेतकरी पुत्राने थेट राष्ट्रपतींना पाठवले पत्र

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *