Kusum Solar Yojana । आनंदाची बातमी! ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज, कसं ते जाणून घ्या

Good news! 'These' farmers will get free electricity, know how

Kusum Solar Yojana । शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना (Schemes) राबवल्या जातात. ज्याचा देशभरातील कोट्यवधी शेतकरी लाभ घेत आहेत. विजेचा वापर जास्त असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर वीजबिल (Light Bill) येते. परंतु काळजी करू नका. कारण केंद्र सरकारची एक योजना (Central Government Scheme) आहे, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना वीज मोफत (free Electricity) मिळणार आहे. आता तुम्हीसुद्धा या योजनेसाठी अर्ज करू शकता. परंतु त्यासाठी नियम आणि अटी आहेत. (Latest Marathi News)

Maharashtra Politics । स्वाभिमानीतील वाद पेटण्याची शक्यता? रविकांत तुपकरांना दिली 15 ऑगस्टची डेडलाईन

2021 साली सरकारने प्रधानमंत्री कुसुम योजनेला (Kusum Solar Yojana) सुरुवात केली आहे. या योजनेचा शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना सौरऊर्जेवर करून त्यांचा खर्च कमी करणे. तसेच त्यांना पाहिजे त्यावेळी वीज उपलब्ध करून देणे हा या योजनेचा एकमेव उद्देश आहे. अनेक शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज केले होते. अशातच आता या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

Sharad Pawar । शरद पवार यांना पुन्हा मोठा धक्का! ‘या’ बड्या नेत्याची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी?

लाभार्थ्यांना येऊ लागले सेल्फ सर्व्हेचे मेसेज

योजनेच्या लाभार्थ्यांना सेल्फ सर्व्हेचे मेसेज येत आहेत. ज्यांना असा मेसेज आला त्यांना हा सर्व्हे ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त महाऊर्जेचं ‘मेडा’ हे ऍप डाऊनलोड करावे लागणार आहे. परंतु हे लक्षात घ्या की हे ऍप फक्त ‘कुसुम ब’च्या लाभार्थ्यांसाठी आहे. त्यावर तुम्हाला सेल्फ सर्व्हेच्या ऑप्शनवर सर्व्हे करावा लागणार आहे.

Eknath Shinde । एकनाथ शिंदेंना मोठा झटका! वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिले तडकाफडकी राजीनामे

जाणून घ्या अटी

2.5 एकर क्षेत्रासाठी शेतकऱ्यांना 3 Hp सोलर पंपाची मागणी करता येते. तसेच 5 एकर क्षेत्रासाठी 5 HP आणि त्यापेक्षा अधिक क्षेत्रासाठी शेतकऱ्यांना 7.5 HP DC पंप मिळेल. 5 एकराहून अधिक क्षेत्रासाठी 10 HP चा सोलर पंप पाहिजे असल्यास 7.5 HP पर्यंतचा खर्च मिळेल. उरलेला खर्च शेतकऱ्याला करावा लागेल. किमतीचा विचार केला तर या पंपाची किंमत रु.1.56 लाख (3 HP), रु. 2.225 लाख (5 HP), रु. 3.435 लाख (7.5 HP) आहे.

Indurikar Maharaj । इंदोरीकर महाराजांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका! ‘ते’ वक्तव्य भोवल, दाखल झाला गुन्हा

Spread the love