शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार वर्षाला 12 हजार

pc Facebook

शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. वर्षभरात होणार शेतीच्या नुसकानामुळे शेतकरी (farmer) त्रस्त होत आहे. याच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती कोलबडून पडत आहे. त्याच शेतकर्‍यांना सरकारने मदतीचा हात दिला आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बजेट सादर करतांना शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.

निळू फुलेंच्या मुलीची राजकारणात एन्ट्री; विधानसभेपूर्वीच केला ‘या’ पक्षात प्रवेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी( Narendra Modi) यांनी शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Nidhi Yojana) सुरू केली आहे. त्यानंतर आता नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेला (Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana) मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने मंगळवारी ही नवी योजना सुरू केली.

लग्न घटिका समीप आली पण, नवरी मंडपातून बेपत्ता; ‘त्या’ 20 मिनिटात नेमकं काय घडलं?

नमो शेतकरी योजने अंतर्गत राज्यातील एक कोटीहून अधिक शेतकऱ्यांना आता वर्षाला 12,000 हजार रुपये दिले जाणार आहेत. केंद्रातून 6,000 तर राज्य सरकारकडून 6 हजार रूपये दिले जाणार आहे. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन समान हप्त्यांमध्ये जमा केली जाईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे मूळ रहिवासी दाखला, आधार कार्ड, बँक खात्याचा तपशील, उत्पन्नाचा दाखला, जमिनीची कागदपत्रे, मोबाईल क्रमांक असणे अत्यंत आवश्यक आहे. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे. यासोबतच शेतकऱ्यांकडे स्वत:ची जमीन असावी. अर्जदार शेतकऱ्याने महाराष्ट्राच्या कृषी विभागाकडे नोंदणी केलेली असावी.

गौतमी पाटील राजकारणात प्रवेश करणार? रीलस्टारने केला मोठा खुलासा म्हणाली…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *