Girish Mahajan । लोकसभा निवडणुकीपूर्वी गिरीश महाजनांचे शरद पवारांना मोठे आव्हान, म्हणाले…

Girish Mahajan

Girish Mahajan । भारतीय जनता पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांना आगामी सार्वत्रिक निवडणुकीत लोकसभेची किमान एक जागा जिंकण्याचे आव्हान दिले. ते उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात पत्रकारांशी बोलत होते.

Rohit Pawar । “आता मी पण भाजपमध्ये जायला…”, ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवार यांची पहिली प्रतिक्रिया

गिरीश महाजन म्हणाले, “मी पवारांना आव्हान देतो की त्यांनी निवडणुकीत किमान एक लोकसभा जागा जिंकण्याचा प्रयत्न करावा. लोकांना (पंतप्रधान नरेंद्र) मोदींची हमी काय आहे आणि त्याचा त्यांना कसा फायदा होतो हे माहित आहे.” मंत्री गिरीश महाजन शरद पवारांवर टीका करताना म्हणाले, “शरद पवार इतकी वर्षे राज्यात होते, त्यांनी राज्यासाठी काय केले? कृषिमंत्री असताना त्यांनी कोणते दिवे लावले असे विचारले तर वाईट वाटेल. पीएम मोदींच्या हमीबद्दल काळजी करू नका. त्यांनी आपला पक्ष सांभाळावा, जनतेची काळजी घ्यावी. असं महाजन म्हणाले आहेत.

Mahashivratri । महाशिवरात्रीच्या मिरवणुकीला गालबोट, विजेचा धक्का लागून 14 मुले गंभीर जखमी

महाजन म्हणाले की, पक्षाने मला लोकसभेबाबत अद्याप विचारलेले नाही. गिरीश महाजन यांना महायुतीच्या जागावाटपाबाबत विचारले असता ते म्हणाले की, जागावाटपाबाबत आमच्या तिन्ही पक्षांमध्ये एकमत आहे. त्यामुळे वाद होणार नाही. प्रत्येकजण जागा मिळविण्यासाठी उत्सुक आहे. मात्र निर्णय सर्वानुमते होईल. असं देखील ते म्हणाले आहेत.

Rohit Pawar । मोठी बातमी! रोहित पवारांना ईडीचा धक्का, सहकारी साखर कारखाना जप्त

Spread the love