सध्या महाराष्ट्रातील राजकारणातून महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पुण्याचे माजी महापौर आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांची प्रकृती खालावली आहे. त्यांची प्रकृती अत्यावस्थ असल्याची माहिती समोर आली. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. सध्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
मोठी बातमी! खासदार गिरीश बापट यांची प्रकृती खालावली
मागच्या काही दिवसांपासून गिरीश बापट यांची तब्बेत बारी नव्हती त्यांच्यावर घरी उपचार सुरू होते. मात्र आज बुधवारी त्यांची प्रकृती अचानक जास्तच बिघडल्याने त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये (Dinanath Mangeshkar Hospital) दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांच्यावर सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
भर कार्यक्रमात गौतमीला टक्कर देणारा पवन नेमका आहे तरी कोण? पाहा त्याचे व्हायरल Video
आता त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी माहिती दिली आहे. गिरीश बापट यांच्यावर आयसीयू मध्ये उपचार चालू आहेत. गिरीश बापट यांची प्रकृती सध्या गंभीर असून त्यांना व्हेंटिलेटरवर म्हणजेच लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.