
GBS । महाराष्ट्रात सध्या गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) ने धुमाकूळ घातला आहे, आणि राज्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पुणे, मुंबई, नाशिकसह राज्यातील इतर शहरांत या आजाराचे थैमान सुरू असून, अनेक रुग्ण आढळले आहेत. सध्या राज्यात जीबीएसमुळे ११ जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालय आणि एका खासगी रुग्णालयात दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृत्यूंची संख्या वाढली आहे.
Chhava Movie | धक्कादायक! ‘छावा’ चित्रपटादरम्यान प्रेक्षकाने केला राडा; सिनेमागृहाचा पडदाच फाडला
मिळालेल्या माहितीनुसार, ससून रुग्णालयात 37 वर्षांचा पुरुष सोनवडी (दौंड) येथील रुग्ण उपचार घेत असताना मृत्यू झाला. त्याला हातात अशक्तपणा आणि जुलाबाचा त्रास होऊन गिळण्यास त्रास होऊ लागला होता. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते, मात्र 17 फेब्रुवारीला त्याचा मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत, पुण्यातील खासगी रुग्णालयात 25 वर्षीय महिलेचा जीबीएसमुळे मृत्यू झाला. तिला जुलाबाचा त्रास सुरू झाल्यावर तिच्या गिळण्यास त्रास होऊ लागला आणि अशक्तपणा वाढला. उपचारादरम्यान 18 फेब्रुवारीला तिचा मृत्यू झाला.
Bjp । भाजप ठरला सर्वात श्रीमंत पक्ष; काँग्रेसच्या उत्पन्नात मोठी वाढ, ‘आप’ आणि बसपाला तोटा
राज्यात जीबीएसची रुग्ण संख्या 211 वर पोहोचली आहे. यामध्ये 56 रुग्ण रुग्णालयात दाखल असून, 36 रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. 16 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत, तर 144 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात अमरावती जिल्ह्यातही जीबीएसचा रुग्ण आढळला आहे. 65 वर्षीय रुग्णाची प्रकृती गंभीर असून त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या राज्यभरात जीबीएसमुळे गंभीर स्थिती निर्माण झाली असून, आरोग्य विभाग या स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे.