Ganpat Gaikwad । उल्हासनगरमध्ये जमिनीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेले भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळी झाडली. गोळी लागल्याने महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही संपूर्ण घटना हिललाईन पोलीस ठाण्यात घडली. पोलिसांनी आरोपी भाजप आमदाराला घटनास्थळावरून ताब्यात घेतले आहे.
Sharad Pawar । लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न जाहीर होताच शरद पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
दरम्यान आता याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. उल्हासनगर या ठिकाणी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणात कोर्टाने त्यांना १४ फेब्रुवारीपर्यंत म्हणजेच ११ दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती मिळत आहे.
उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या. या सगळ्या झटापटीची, अंगावर येणाऱ्या क्रौर्याची सगळीच दृष्य त्या पोलिस स्टेशनच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहेत. सध्या याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Mahesh Gaikwad Health Update । शिंदे गटाचे महेश गायकवाड व्हेंटिलेटरवर; प्रकृती अतिशय चिंताजनक
पाहा व्हिडीओ
भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याचं CCTV; पाहा नेमकं काय घडलं#GanpatGaikwad #MaheshGaikwad #Shivsena #BJP #EKnathShinde #DevendraFadanvis pic.twitter.com/yHKGVWzVrw
— Shivraj Yadav | शिवराज यादव 🇮🇳🖊️ (@shiva_shivraj) February 3, 2024