सध्या बारामती (Baramati) तालुक्यामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. बारामती तालुक्यातील भोंडवेवाडी गावच्या हद्दीत एका अनोळख्या जेष्ठ व्यक्तीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज मंगळवारी हा मृतदेह आढळून आला आहे. यामुळे तेथील परिसरात खळबळ उडाली आहे.
मोठ्या बदलांसह हिरोची पॅशन प्लस लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
एका मेंढपाळास हा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेह आढळल्यानंतर मेंढपाळाने लगेचच याबाबत माहिती गावच्या पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाची पाहणी केली. पाहणी केली असता त्यांना अंदाजे ६० ते ६५ वयाच्या पुरुषाचा मृतदेह आढळून आला असल्याची माहिती सांगितली आहे.
मोठी बातमी! बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका पाहता गुजरातने 30,000 लोकांना पाठवलं सुरक्षित स्थळी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह पूर्णतः सडलेल्या अवस्थेत होता. केवळ हाडाचा सांगाडा होता. मृत झालेल्या व्यक्तीस अन्न-पाणी न मिळाल्याने हा मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Video | उर्फी जावेदचा ‘तो’ व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले; म्हणाले, “तुला काही…”