Election Commission । ब्रेकिंग! निवडणूक आयोगाचा शिंदे सरकारला सर्वात मोठा धक्का, करावेच लागणार ‘हे’ महत्त्वाचे काम

Election Commission

Election Commission । केंद्रीय निवडणूक आयोगाकडे राज्य सरकारने (State Govt) मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांची बदली (Replacement of Iqbal Singh Chahal) रोखण्यासाठी महापालिका आयुक्तांना 3 वर्षांच्या निकष लावू नये अशी मोठी मागणी केली होती. पण आता या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारला मोठा धक्का दिला आहे. (Latest marathi news)

Manoj Jarange । जरांगेंच्या भेटीदरम्यान काय झालं? स्क्रीप्टच्या आरोपांवर शरद पवारांचे प्रत्युत्तर

राज्य सरकारची याचिका आयोगाने मंगळवारी फेटाळली आहे. त्यामुळे आता चहल यांच्याबरोबरच अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आणि अन्य काही अधिकाऱ्यांच्या बदल्या सरकारला कराव्या लागणार आहेत. निवडणूक आयोगाकडून गेल्या आठवड्यांमध्येच 3 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ पदावर असणाऱ्या महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्या कराव्यात,’ असा आदेश देण्यात आला होता.

Manoj Jarange । मोठी बातमी! फडणवीसांवर आरोप करणे मनोज जरांगेंना पडणार महागात!

अशातच आता निवडणूक आयोगाच्या आदेशामुळे चहल यांच्याबरोबरच काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्याच लागतील. थेट निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग नसल्याने आयुक्त तसेच उपायुक्तांना आदेशातून वगळावे, अशी विनंती राज्य सरकारकडून करण्यात आली होती. असं एक पत्रच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारने निवडणूक आयोगाला पाठवलं होतं. पण हे पत्र आयोगाने फेटाळून लावले आहे.

Ajit Pawar । अर्थसंकल्पात अजित पवारांनी केल्या सर्वात मोठ्या घोषणा; वाचा एका क्लिकवर

Spread the love