एकनाथ शिंदेंनी सांगितली राजकीय स्थिती, 11 महिन्यात इतकं तर मग आगामी काळात…

Shinde

‘शासन आपल्या दारी’ या आयोजित उपक्रमात बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विरोधकांवर चौफेर टोलेबाजी केली आहे. मागच्या अडीच वर्षात जे स्पीड ब्रेकर केले होते ते आम्ही तोडून काढले आहेत. आम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी कोणतेही काम केले नाही. परंतु, विरोधक असे म्हणतात की आमची जाहिरातबाजी करत आहे. जे काल आमच्यावर टीका करत होते तेच आज शासन आपल्या दारात, असे फलक लावत आहेत. (Latest MarathiNews)

समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच, पुन्हा एक भीषण अपघात; कार थेट पडली अंडरपासमध्ये

पुढे ते बोलताना म्हणाले की, शासनाच्या सर्व योजना जनतेपर्यंत पोहोचल्या आहेत. सर्व नियम बाजूला ठेवून आम्ही शेतकऱ्यांना १० हजार कोटीचे वाटप केले. पावसाला सुरुवात झाल्याने बळीराजा सुखावला आहे. ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचा विजय झाला आहे. आमच्या कामांमुळे विरोधकांना धडकी भरली आहे. त्यामुळे ते आमच्यावर आरोप करत आहेत, परंतु आम्ही त्यांच्या आरोपांना कामातून उत्तर देऊ, असे शिंदे बोलताना म्हणाले आहेत.

ब्रेकिंग! शरद पवार यांना मोठा धक्का; ‘हा’ बडा नेता BRS मध्ये जाणार

सत्ता आज आहे उद्या नसेल. मी कालही एक कार्यकर्ता म्हणून काम केले आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करेन. बाळासाहेब नेहमी सांगायचे की, नोकरी घेण्यापेक्षा नोकरी देणारे हात बनवा. बाळासाहेबांनी जे जे सांगितले ते ते आम्ही केले. आम्ही 11 महिन्यात एवढं तर मग पुढील काळात आमचे काम कसे असेल याची धडकी विरोधकांना भरत आहे, त्यामुळे ते आपल्यावर आरोप करत असल्याची टीका शिंदे यांनी केली आहे.

मुंबईत पावसाचा तडाखा, लोकांनी ट्विटरवर व्यक्त केला संताप, फोटो आणि व्हिडिओ व्हायरल; पाहा धक्कादायक दृश्ये

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *