Eknath Shinde । बुलढाण्यात विधानसभा निवडणुकांच्या (Assembly elections in Buldhana) तोंडावर महायुतीसाठी एक नवीन संकट उभं राहिलं आहे. इथे शिंदे गटाचे उमेदवार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहेत, पण भाजपकडूनच त्यांना आव्हान देण्यात आलं आहे. भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून गायकवाड यांना तोंडावर आव्हान दिलं आहे. यामुळे महायुतीच्या सत्ताधारी गटात चुरस वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Politics News )
Ajit Pawar । अजित पवार यांनी आपल्या काटेवाडी येथील निवासस्थानी दिवाळी पाडवा साजरा केला
विजयराज शिंदे यांनी बंडखोरीच्या कारणांवरही प्रकाश टाकला आहे. “मी बंडखोरी केली नाही, तर मैत्रीपूर्ण लढतीसाठी परवानगी मागितली आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी स्पष्ट केलं की, शिंदे गटाच्या उमेदवाराने मागील पाच वर्षांत भाजपाचे स्थानिक आणि राष्ट्रीय नेते अपमानित केले आहेत. “या उमेदवाराने शिवी देत पंतप्रधानांचा अपमान केला आहे.” यामुळे ते त्यांच्याविरुद्ध लढण्याचा निर्णय घेतला आहे.
Eknath Shinde । मुख्यमंत्रीपदाबाबत एकनाथ शिंदेंचे सर्वात मोठे वक्तव्य!
विजयराज शिंदे यांनी आपल्या वक्तव्यात म्हटलं की, “आमचे दिवंगत नेते भाऊसाहेब फुंडकर यांचा अवमान झाला आहे. माझ्यावर जीवघेण्या हल्ल्याच्या आरोपांनंतर मी त्यांच्या विरोधात उभा राहिलो.” ते पुढे म्हणाले की, “या मतदारसंघात भाजपची ताकद दाखविणार आहे.”
Parth Pawar । मी शरद पवार यांना भेटायला जाणार; पार्थ पवार यांचे धक्कादायक वक्तव्य
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विजयराज शिंदे यांना चर्चेसाठी निमंत्रण आलं आहे, त्यामुळे आगामी निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो. मुख्यमंत्री आणि विजयराज यांच्यातील चर्चा कशी होते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यामुळे बुलढाण्यात राजकीय वातावरण तापले असून, आगामी निवडणुकांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे.
Maruti, Hyundai आणि Mahindra च्या कार्सवर लाखो रुपयांचा डिस्काऊंट