Dombivli Palava Building Fire News । ब्रेकिंग न्यूज! डोंबिवलीत 8 व्या मजल्यावरून १८ व्या मजल्यापर्यंत भीषण आग 

Dombivli Palava Building Fire News

Dombivli Palava Building Fire News । सध्या आग लागल्याची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. डोंबिवलीतील पलावा सिटी मधील इमारतीला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तेथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीमधील रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Sharad Pawar । अयोध्या आमंत्रणाबाबत शरद पवार यांचे सर्वात मोठे वक्तव्य

माहितीनुसार, 18 मजली इमारतीला आग लागली असून आठव्या मजल्यावर ही आग लागली. त्यानंतर गच्ची पर्यंत ही आग पसरली आहे. डोंबिवली जवळीवर जवळील कोणी पलावा येथील अरेलिया इमारतीच्या सातव्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली आहे आज दुपारच्या सुमाराची घटना घडली आहे. सातव्या मजल्यावर ठेवलेल्या वॉशिंग मशीनमध्ये शॉटसर्किट झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Sadhus Assaulted in West Bengal । मोठी बातमी! मुलींना रस्ता विचारला म्हणून तीन साधूंना बेदम मारहाण; धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

ही आग एवढी भीषण होती की चार ते पाच मजल्यापर्यंत आग गेली होती. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. या आगीमध्ये इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे.

Pune Crime News । ब्रेकिंग न्यूज! पुणे हादरलं, कात्रज चौक परिसरात डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या

Spread the love