Rohit Pawar। रोहित पवारांच्या टी-शर्टवरून अधिवशेनात रंगली चर्चा, अजूनही ‘या’ मागणीवर ठाम

Discussion raged in Adhivashena over Rohit Pawar's t-shirt, still insisting on 'this' demand

Rohit Pawar । मुंबई : ‘कर्जत जामखेडमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, तसेच कर्जत जामखेडच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी,’ यासाठी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आक्रमक झाले आहेत. त्यासाठी त्यांनी विधानसभेच्या (Vidhansabha) परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून भर पावसात आंदोलन केले होते. उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samantha) यांनी समजूत काढल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले. (Latest Marathi News)

Success Story। शेतकऱ्याचा नादच खुळा ! अवघ्या 20 गुंठ्याच्या काकडीतून कमावले साडेतीन लाख रुपये

विधिमंडळाच्या अधिवेशनातदेखील त्यांनी हाच मुद्दा लावून धरला आहे. आज त्यांनी क्रिम कलरचा एक हटके टी-शर्ट घालून प्रवेश केला आहे. या टी-शर्टवर समोरच्या बाजूला मोठ्या अक्षरात MIDC असं लिहिले आहे. तर पाठीमागच्या बाजूला “ध्येय विकासाचं ठेवूया, वेध भविष्याचा घेऊया, युवाशक्तीला संधी देऊया, आणि फक्त मुद्दयाचं बोलूया!”, असं लिहिले आहे.

Nitin Desai suicide । ब्रेकिंग! सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी संपवलं जीवन

रोहित पवार यांनी ट्विट (Rohit Pawar Tweet) करत या शर्टमागची गोष्ट सांगितली आहे. “माझ्या मतदारसंघातील MIDC सह सर्वच युवांसाठी महत्त्वाचा असणारा रोजगाराचा विषय अधिवेशनात लावून धरल्याने मतदारसंघाबाहेरच्या एका मित्राने हा टी-शर्ट भेट दिला आहे. या संदेशामागची त्याची कल्पना मला आवडली असल्याने आज हा टी-शर्ट घालून विधानभवनात प्रवेश केला,” असे पवार यांनी सांगितले.

Stuffed Idli Recipe। सकाळच्या गडबडीत नाश्त्यासाठी ‘या’ ट्रिक्स वापरून ट्राय करा मऊ आणि लुसलुशीत स्टफ्ड इडली; जाणून घ्या संपूर्ण रेसिपी

Spread the love