Dhananjay Munde Wife Car Accident । सर्वात मोठी बातमी! कृषिमंत्री धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या कारला अपघात

Dhananjay Munde Wife Car Accident

Dhananjay Munde Wife Car Accident । महाराष्ट्राचे कृषिमंत्री धनंजय मुंडेंच्या पत्नी राजश्री मुंडेंच्या कारचा अपघात पुणे-सोलापूर महामार्गावर झाला आहे. पहाटेच्या सुमारास सोरतापवाडी येथे राजश्री मुंडे यांच्या कारने एका खासगी ट्रॅव्हल बसला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात धनंजय मुंडेंच्या कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले, तर बसच्या पाठीमागील भागालाही गंभीर नुकसान झाले. सुदैवाने राजश्री मुंडेंना किरकोळ दुखापत झाली असून, त्यांनी त्यानंतर मुंबईकडे प्रवास सुरू केला.

Maharashtra Election 2024 Date । सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजलं; ‘या’ दिवशी होणार मतदान

मिळालेल्या माहितीनुसार, राजश्री मुंडे मुंबईकडे जात असताना हा अपघात झाला. अपघाताच्या ठिकाणी तात्काळ मदत कार्य सुरू करण्यात आले असून, अधिक तपास चालू आहे. दरम्यान, धनंजय मुंडे या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असून, त्यांनी नुकत्याच पंकजा मुंडे यांच्यासोबत दसरा मेळाव्यात भाग घेतला होता. हा मेळावा तब्बल 12 वर्षांनी एकत्र येण्याचा ऐतिहासिक क्षण ठरला, ज्यात त्यांनी विरोधकांवर तिखट टीका केली.

Ajit Pawar । इगतपुरीचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे, आणि राजश्री मुंडेंच्या अपघातानंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या सक्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आगामी 20 नोव्हेंबर रोजी मतदान आणि 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहेत. या घटनांमुळे राज्यातील राजकीय वातावरणात चुरशीचा अनुभव येत आहे.

Baba Siddiqui । बाबा सिद्दीकींसह त्यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांना मारण्याचा होता प्लॅन, आरोपीचा धक्कादायक खुलासा

Spread the love