Dhananjay Munde । राजकीय घडामोडींना वेग! धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार?

Dhananjay Munde Corona Positive

Dhananjay Munde । बीड: केज येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ही राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे. या हत्येच्या प्रकरणात मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्या राजकीय संबंधांबाबत विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत इशारा दिला की, आरोपीच्या राजकीय संबंधांचा विचार न करता त्याच्यावर मोक्कानुसार कारवाई केली जाईल. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या इशाऱ्यानंतर आता मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढण्यात येईल का?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Baramati News । बारामती हादरली! मावस बहिणीशी बोलल्याने तरुणावर कोयत्याने हल्ला

संतोष देशमुख हत्याप्रकरणात विरोधकांनी वाल्मिक कराडचे नाव घेत धनंजय मुंडे यांना लक्ष्य केले आहे. वाल्मिक कराड हे मुंडे यांचे जवळचे सहकारी मानले जातात, आणि याच कारणामुळे विरोधकांनी मुंडे यांना अधिवेशनात जोरदार फटके दिले. गुरूवारी आणि शुक्रवारी दोन्ही दिवस मुंडे अधिवेशनात उपस्थित नव्हते, ज्यामुळे त्यांच्याबद्दल चर्चा आणखी वाढली आहे.

Mumbai News । धक्कादायक! कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला लोखंडी रॉडने मारहाण

राजकीय वर्तुळात यावर चर्चा आहे की, धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बाहेर टाकले जाईल. या संदर्भात आज सकाळी मुंडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी भेटले. या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यामध्ये मुंडे यांना मंत्रिमंडळात राहायचं की नाही याबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीत नेमकी काय निर्णय होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Mumbai boat tragedy । मुंबई बोट दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू, 98 जण जखमी, मुख्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणा

Spread the love