Madha Loksabha । शरद पवारांचा मोठा गेम, धैर्यशील मोहित पाटील करणार शरद पवार गटात प्रवेश

Madha Loksabha

Madha Loksabha । पुणे : मागील काही दिवसांपासून माढा लोकसभा मतदार संघ चांगलाच चर्चेत आला आहे. याला कारणही अगदी तसेच आहे. माढा लोकसभा मतदार संघात महायुतीने रणजितसिंह निंबाळकर (Ranjit Singh Nimbalkar) यांना उमेदवारी दिली आहे. तेव्हापासून धैर्यशील मोहित पाटील नाराज होते. अशातच आज पुण्यात धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyashil Mohite Patil) हे शरद पवारांच्या (Sharad Pawar) भेटीला आले आहेत.

Reliance Electric Car । मुकेश अंबानी करणार बडा धमाका, इलेक्ट्रिक कार बाजारात रिलायन्सची एंट्री

विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. मागील काही दिवसांपासूनच धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटात येणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. याच पार्श्वभूमीवर ते आज शरद पवारांची भेट घेण्यास दाखल झाले आहेत. या भेटीनंतर धैर्यशील मोहिते पाटील हे १४ एप्रिल रोजी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. (Dhairyashil Mohite Patil vs Ranjit Singh Nimbalkar)

Viral News । भटक्या कुत्र्याचा मुलावर हल्ला, व्हिडीओ पाहून तुम्हालाही सुटेल थरकाप

इतकेच नाही तर ते १६ एप्रिल रोजी ते निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या निर्णयामुळे महायुतीला माढ्यात सर्वात मोठा धक्का बसू शकतो. माढा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध रणजितसिंह निंबाळकर अशी लढत होऊ शकते. या अटीतटीच्या लढतीत कोणाचा विजय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Lok Sabha Elections २०२४ । पुण्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर! शरद पवारांचा वळसे पाटलांना मोठा धक्का

Spread the love