Devendra Fadnavis । लोकसभा निवडणुका (Lok Sabha Elections २०२४) तोंडावर आल्या असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक नेते, कार्यकर्ते नाराज असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे बड्या नेत्यांकडून त्यांची नाराजगी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे इंदापूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी आज इंदापुरातील भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.
Ashok Chavan । अशोक चव्हाणांबाबत काँग्रेसमधून धक्कादायक बातमी समोर!
त्याचबरोबर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (५ मार्च) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर गंभीर आरोप केले. अकोल्याचे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांच्या निधनासाठी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी शुभेच्छा दिल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
Car accident । भीषण अपघात! भरधाव कार झाडावर आदळली, ५ ते ६ जण दगावल्याची शक्यता
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या दाव्याच्या समर्थनार्थ नाना पटोले यांच्या अकोलेतील भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट केला आहे. नाना पटोले यांना ही पोस्ट टॅग करत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अशी विधाने राज्याच्या संस्कृतीच्या विरोधात आहेत. पटोले यांचे वक्तव्य अत्यंत असंवेदनशील असून त्यांनी माफी मागावी, असे फडणवीस यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या संदेशात म्हटले आहे.
Manoj Jarange Patil । सर्वात मोठी बातमी! जरांगे पाटील लढवणार विधानसभेची निवडणूक