Devendra Fadnavis । देवेंद्र फडणवीस यांचे सर्वात मोठे वक्तव्य

Manoj Jarange And Devendr Fadanvis

Devendra Fadnavis । मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रविवारी त्यांच्या अंतरवाली सराटी या गावी मराठा समाजाच्या सभेला संबोधित करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस त्यांना मारण्याचा कट रचत आहेत. देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातील मराठ्यांचा दर्जा कोणत्याही प्रकारे नष्ट करायचा आहे, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला. मनोज जरांगे देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील सागर बंगल्याकडे रवाना झाले आहेत. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Maratha Reservation । ब्रेकिंग! महाराष्ट्राचे राजकारण तापले, फडणवीसांवर आरोप केल्यांनतर भाजप आमदाराचा जरांगेंना इशारा

याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सागर बंगला हा सरकारी आहे. त्यामुळे या ठिकाणी सरकारी कामासाठी कोणीही येऊ शकत. कुठल्या नशेतून ते बोलत आहेत ते मला माहिती नाही. त्यामुळे ते जे बोलले ते बिन बुडाचे आरोप आहेत. मी मराठा समाजासाठी खूप काही केले आहे. सर्व योजनांची सुरूवात मी केली आहे. असं फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis । “…त्यामुळे देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षण आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करतायेत” जरांगेंच मोठं वक्तव्य

आत्तापर्यंत जी स्क्रिप्ट उद्धव ठाकरे, शरद पवार साहेब बोलत होते. तीच स्क्रिप्ट ते मनोज जरांगे का बोलत आहेत? असा मोठा प्रश्न देखील देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षण हाय कोर्टात आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील टिकवलं होत. त्यामुळे कोणी बोललं म्हणून मराठा समाज विश्वास ठेवेल असं म्हणणारा मी नाही. असही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

Devendra Fadnavis । जरांगेंनी आरोप केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी कशाला…”

Spread the love