Delhi New CM Atishi । दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. आम आदमी पार्टी विधिमंडळ पक्षाचे नवे नेते आणि दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा आज बारा वाजता करण्यात आली आहे. आपच्या आमदारांनी तसेच अरविंद केजरीवाल यांनी विधिमंडळ नेतेपदी अतिशी यांची निवड केली आहे.
नुकताच दिल्लीमधील मद्यधोरण घोटाळा प्रकरणातून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाला आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. केजरीवाल तसेच मनीष सिसोदिया यांच्या विश्वासू सहकारी आतिशी आहेत. त्यांच्याकडे वित्त, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम विभाग, ऊर्जा, महसूल, कायदा, नियोजन, सेवा, माहिती आणि प्रसिद्धी आणि दक्षता यासारखी महत्त्वाची खाती सांभाळायला होती.
Sujay Vikhe Patil । मोठी बातमी! सुजय विखे पाटील ‘या’ ठिकाणाहून निवडणूक लढविण्यास इच्छुक
दरम्यान, आतिशी यांनी 2012 मध्ये राजकारणात प्रवेश केला होता. 2019 मध्ये त्या लोकसभा निवडणूक देखील लढल्या होत्या परंतु या निवडणुकीत भाजपच्या गौतम गंभीर यांनी आतिशी यांचा पराभव केला होता. 2020 पासून त्या दिल्लीतील कालकाजी विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत.