Darshana Pawar । राजगडाच्या पायथ्याशी MPSC च्या परीक्षेत राज्यात तिसऱ्या आलेल्या दर्शना पवार (Darshana Pawar) हिचा मृतदेह संशयास्पद स्थितीत 18 जून रोजी आढळून आला होता. त्यावरून पोलिसांनी आपली सूत्रे कामाला लावून दर्शनाच्या मारेकऱ्यांना (Rahul Handore) शोधण्यात यश आले. हत्या झाल्यानंतर तिचा मारेकरी राहुल हंडोरे याला पोलिसांनी अटक केली आहे.
राहुलला ती चूक भोवली
दर्शनाची हत्या करणाऱ्या राहुलने एक चूक केली आणि तो पोलिसांना सापडला. राहुल ज्यावेळी दर्शनाला राजगड या ठिकाणी घेऊन आला होता त्यावेळी तो तिला बाईकवर घेऊन आला होता. त्यामुळे त्याची तीच चूक त्याला चांगलीच भोवली. तो बाईकवर आल्यामुळे दर्शनाच्या हत्येची माहिती समजताच पोलिसांनी रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज चेक केल्या आणि त्यामध्ये हे दोघे बाईकवर जाताना दिसले. त्यामुळे पोलिसांना राहुलवर संशय आला. आणि त्यामुळे पोलिसांनी राहुलचा शोध घेण्यास सुरुवात केली.
OPPO A78 4G । Oppo चा नवीन फोन लवकरच होणार लॉंच, ‘हे’ असतील धमाकेदार फिचर; जाणून घ्या सविस्तर
त्यांनतर पोलिसांनी राहुलच्या घरी चौकशी केली मात्र त्यावेळी तो घरी देखील नव्हता. राहुलच्या घराला कुलूप होतं. तो फरार झाल्याचं लक्षात आल्यावर त्यानेच दर्शनाचा खून केल्याचा पोलिसांचा संशय बळावला आणि तो पोलिसांच्या जाळ्यात आला.
हत्या करून महाराष्ट्राबाहेर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो खून करून रेल्वेने सांगलीला गेला. तेथे न थांबता तो गोव्याला निघून गेला. गोव्यावरून त्याने चंदीगड आणि तेथून पश्चिम बंगाल येथील हावडा गाठले. परत त्याने तेथून मुंबई गाठली. परंतु पोलिसांची दिशाभूल व्हावी यासाठी त्याने मोबाइल बंद ठेवला होता. स्थानिक फोनवरून तो आपल्या मित्रांना आणि कुटुंबाला संपर्क साधत होता. संपर्क साधल्यानंतर तो लगेचच आपले ठिकाण बदलत होता. मात्र पोलिसांना याची माहिती फोन मागणाऱ्या प्रवाशांनी दिली आणि पोलिसांना त्याला चार दिवसात अटक करण्यात यश आले.
Hero पासून TVS पर्यंत ‘या’ शक्तिशाली मोटरसायकल खरेदी करा फक्त 80 हजारांमध्ये; जाणून घ्या अधिक..