Darshana Pawar । ‘अगोदर कटरने गळा चिरला, मग दगडाने डोकं ठेचलं..; राहुलने दिली खुनाची कबुली

Darshana Pawar

Darshana Pawar । MPSC च्या परीक्षेत राज्यात तिसऱ्या आलेल्या दर्शना पवार (Darshana Pawar) हिचा मृतदेह राजगडाच्या पायथ्याशी संशयास्पद स्थितीत 18 जून रोजी आढळून आला होता. 4 दिवसांनंतर पोलिसांना दर्शनाच्या मारेकऱ्यांना शोधण्यात यश आले आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु असताना दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहे. दर्शनाची हत्या तिचाच मित्र राहुल हंडोरे (Rahul Handore) याने केली असून त्याला पोलिसांनी मुंबईतून (Rahul Handore Arrested) अटक केली आहे. आता त्याची कसून चौकशी केली जात आहे. (Latest Marathi News)

धक्कादायक! वरात दारात आणि प्रियकारसोबत पळाली तरुणी, शारिरीक संबंध ठेवले अन्..

पोलीस तपासादरम्यान त्याने तिला कशाप्रकारे ठार केले हे सांगितले आहे. राहुल आणि दर्शना राजगडावर गेले असता तेथे त्यांच्यात लग्नाच्या विषयावरुन वाद झाला. त्यानंतर राहुलने रागाच्या भरात दर्शनाच्या गळ्यावर कटरने तीन ते चारवेळा वार केले. तरीही तो थांबला नाही, त्यानंतर त्याने तिच्या डोक्यात दगड घालून तिला ठार केले. त्याने हा संपूर्ण प्रकार अनावधानाने घडला, असे राहुलने पोलीस तपासादरम्यान सांगितले. (Pune Crime News)

संभाजी भिडेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, ”15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस नाही”

राहुल हा नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील शाहवाडी येथे राहतो. त्याच ठिकाणी दर्शनाचे मामा राहतात. राहुल आणि तिच्या मामाचे घर जवळ होते. त्यामुळे त्या दोघांची ओळख लहानपणापासून होती. राहुलच्या घरची परिस्थिती खूप सामान्य होती. दर्शना राज्यात तिसरी येताच ती राहुलपासून लांब राहत होती. तिने त्याला लग्नाला नकार दिला होता. त्यामुळे तो नाराज झाला होता, याच रागातून राहुलने दर्शनाची हत्या केली.

धक्कादायक! ठाकरे गटातील नेत्याच्या घरात घुसून हल्ला

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *