Cricket News । LIVE क्रिकेट सामन्यात घडली मोठी घटना, गोलंदाजी करताना हृदयविकाराचा झटका येऊन खेळाडूचा जागीच मृत्यू

Cricket News

Cricket News । क्रिकेट सामन्यांदरम्यान खेळाडूंच्या मृत्यूच्या बातम्या आपण खूपवेळा ऐकल्या आहेत. अशा अपघातांची प्रत्येकाची स्वतःची कारणे आहेत. काहींचा चेंडू लागल्याने तर काहींचा फलंदाजी करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. पण, ज्या खेळाडूबद्दल आपण बोलत आहोत त्याचा वर्षाच्या शेवटच्या दिवशी मृत्यू झाला. इंदलसिंग जाधव बंजारा असे मृत्यू झालेल्या खेळाडूचे नाव असून त्याचे वय अवघे २२ वर्षे आहे.

Accident News । पिकनिकला जाणे तरुणांच्या बेतले जीवावर! कारचा भीषण अपघात, ६ जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

आता प्रश्न असा आहे की ही घटना कधी घडली? हा सामना कुठे खेळला जात होता? माहितीनुसार, ज्या सामन्यात हा अपघात झाला तो सामना 2023 च्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 31 डिसेंबर रोजी खेळला गेला होता. मध्य प्रदेशातील खारगाव जिल्ह्यातील एका गावात हा सामना खेळला जात होता. म्हणजे अपघाताचा साक्षीदार असलेला सामना स्थानिक पातळीवर खेळला जात होता.

Viral Video । क्रिकेटच्या मैदानावर फलंदाजीसाठी उतरले नेताजी, शॉट मारण्याच्या प्रयत्नात पडले तोंडावर; पाहा Video

क्रिकेटरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला

इंदलसिंग जाधव बंजारा याचा मृत्यू हृदयविकाराचा झटक्याने झाला. बधवा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कटकूट गावात क्रिकेट सामन्यादरम्यान जाधव गोलंदाजी करत असताना त्याला अस्वस्थ वाटले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,जाधव याला मृत अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले होते. बंजारा याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Corona News । मोठी बातमी! महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण; धक्कादायक माहिती समोर

Spread the love